नणंदबाईंना कडक नोटा आवडतात! नवनीत राणांचा ठाकुरांवर हल्ला

अमरावती – दहा वर्षे मतदारसंघाला मागे नेण्याचे काम माझ्या नणंद बाईने केले आहे. माझी नणंद बाई ३ टर्म पासून प्रतिनिधित्व करत आहे. त्यांना फक्त कडक नोटा आवडतात, असे म्हणत माजी खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली. त्या तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश श्रीरामजी वानखडे यांच्या प्रचारार्थ बोलत होत्या. नवनीत राणा म्हणाल्या की, नणंदबाईंना फक्त नोटा आवडतात. बाकी कार्यकर्ते सतरंजी उचलतात. माझ्या नणंद बाईने जाती जातींमध्ये विभाजन करून मते घेतले आहेत. मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचे लोणी खाण्याचे काम नणंद बाई करत आहे. एकही रोजगार उपलब्ध करून दिला नाही. नणंद बाईने खूप कमावले आहे. तिकीट देणार सांगून त्यांनी दर्यापूरच्या उमेदवारचे घर लुटले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top