Home / News / नगरमध्ये ‘ड्रोन’च्या घिरट्या! नागरिकांत घबराट पसरली

नगरमध्ये ‘ड्रोन’च्या घिरट्या! नागरिकांत घबराट पसरली

अहमदनगर -जिल्ह्यातील नगर तालुक्यातील गुणवडी परिसरातील आकाशात रात्रीच्यावेळी अंधारात ड्रोन घिरट्या घालत आहे.त्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. आतापर्यंत पाथर्डी,शेवगाव या...

By: E-Paper Navakal

अहमदनगर -जिल्ह्यातील नगर तालुक्यातील गुणवडी परिसरातील आकाशात रात्रीच्यावेळी अंधारात ड्रोन घिरट्या घालत आहे.त्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे.

आतापर्यंत पाथर्डी,शेवगाव या तालुक्यातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी नागरी वस्त्यांवर ड्रोन घिरट्या घालत असल्याच्या घटना घडल्या आहेत.आता हे लोण नगर तालुक्यातही पसरले आहे.नगरच्या गुणवडी परिसरात २ दिवसांपूर्वी रात्री आठ वाजता अचानकपणे अंधारात नागरी वस्त्यांवर ड्रोन घिरट्या घालताना नागरिकांच्या निदर्शनास आले.सुमारे चार ते पाच तासांपर्यंत गुणवडी ते मांडवगण रस्त्यावरील वस्त्या आणि गुणवडी ते रुई छत्तीशी रस्त्यावरील वस्त्यांवर ड्रोनच्या घिरट्या सुरूच होत्या.सुरुवातीला नागरिकांनी ड्रोनकडे दुर्लक्ष केले.परंतु चार ते पाच तासापर्यंत ड्रोन फिरत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.

Web Title:
संबंधित बातम्या