नंदुरबार :राज्याचे तापमान ४० ते ४४ अंशाच्या घरात गेले आहे. मात्र असे असतानाही नंदुरबारमध्ये त गारपिटीसह वादळी वाऱ्यासह पावसाने दस्तक दिली आहे. त्यामुळे शेतीसह ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पहायला मिळते. रविवारी दुपारी नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या रापापुरमध्ये भर दुपारी अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह गारपिटीने हजेरी लावली. या अवकाळी पावसाने येथील ग्रामस्थांचे, शेकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
या अवकाळी पावसामुळे उन्हळ्यात कोरडे झालेले नदी नाले ओसंडून वाहत आहेत.तर दुसरीकडे वादळामुळे काहींच्या घरांची छत उडून गेली आहेत. तर काहींच्या घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. तर काही ठिकाणी रापापूर परिसरातील ४० ते ४५ घरे कोसळून ग्रामस्थ बेघर झाले आहेत. अशावेळी शेतकरी आता संकटात सापडला आहे. अनेकदा शेतकऱ्यांना अशा संकटांना सामोरे जावे लागते. मदत मिळेल अशी शेतकऱ्याची आशा असते. मात्र सरकार यावर गांभीर्याने विचार करत नसल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे आता अवकाळी पावसाने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पंचनामे होणार का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.