नंदुरबारमध्ये भीषण अपघात! ५ जणाचा मृत्यू! एक जखमी

नंदुरबार – भाऊबीजेच्या दिवशी नंदुरबारमधील पिंपळोद गावाजवळ भीषण अपघात घडला असून या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो वाहनाने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ३ मोटरसायकलींना चिरडले. जखमींना उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचा आणि मोटरसायकलींचा अक्षरश: चुराडा झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top