मुंबई – सांताक्रूझ (पश्चिम) खोतवाडी-भिमवाडा येथे अत्यंत धोकादायक अवस्थेत असलेल्या संक्रमण शिबिरामुळे परिसरातील खोल्यांमध्ये राहणार्या रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. एसआरए कार्यालयाने दुर्घटना घडण्यापूर्वीच दखल द्यावी,अशी मागणी खोतवाडी-भिमवाडा झोपडपट्टी सहकारी गृहनिर्माण संस्थेने केली आहे.
एसआए कार्यालयाने या संक्रमण शिबिराचे स्ट्रक्चरल आडिट केले होते. त्यांच्या अहवालानुसार सी-१ म्हणजे अत्यंत धोकादायक म्हणून घोषित केले आहे. संबंधित अभियंत्यांनी संक्रमण शिबिराची वेळीवेळी पाहणी केली आहे. मात्र निर्णय घेण्याबाबत चालढकल केली जात आहे.या संक्रमण शिबिरात राहणार्या रहिवाशांचा एसआरए कार्यालयाने सहानभूमीपूर्वक विचार करुन मार्ग काढावा, दुर्घटना घडण्याची वाट पाहू नये,अन्यथा सर्वस्व जबाबदारी एसआरए कार्यालयावर राहिल,असे खोतवाडी-भीमवाडा झोपडपट्टी गृहनिर्माण संस्थेने सांगितले.