धुळे – धुळ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत अनुचित प्रकार घडू नये, म्हणून ७०० सीसीटीव्ही कॅमेरे, पाच ड्रोन कॅमेरे मिरवणुकीवर नजर ठेवणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली. पोलीस निरीक्षक,सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि अमलदारांसह अन्य कर्मचारी विसर्जन मिरवणुकीच्या नियोजित मार्गांवर तैनात करण्यात आले असून, मंडळांनी पारंपरिक पद्धतीच्या वाद्यवृंदाचा वापर करुन मिरवणुकांना शक्यतो लवकर सुरुवात करावी, असेही बारकुंड यांनी सांगितले.
रात्री बारापर्यंत विसर्जन पूर्ण होणे अपेक्षित असून मंडळांनी आपले फलक, झेंडे काढून घ्यावेत, अशी सूचनाही त्यांनी केली. ३० सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ईदनिमित्त मिरवणूक निघेल. या मिरवणुकीचा समारोप दुपारी दीड वाजता होईल. तीन फूटापेक्षा अधिक उंचीचा मिरवणूक झेंडा असू नये, असेही त्यांनी नमूद केले.