धुळ्यात मेणबत्तीच्या कारखान्यात आग! चार महिला मजुरांचा होरपळून मृत्यू

धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर गावाजवळ असलेल्या चिपलीपाडा शिवार येथे एका मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत चार महिला मजुरांचा मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीररित्या भाजल्या.
वाढदिवसानिमित्त वापरल्या जाणाऱ्या आकर्षक मेणबत्त्या या कारखान्यामध्ये बनवल्या जात होत्या. या दरम्यान आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही भीषण आग लागली. या आगीत होरपळून चौघी महिलांचा मृत्यू झाला.
मयत मजूर हे जैताने येथील राहणारे असल्याचे समजते. आशाबाई भैया भागवत, राजश्री भैया भागवत, नयना संजय माळी, सिंधुबाई धुडकू राजपूत अशी मृतांची नावे आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top