धुळे – भागवत कथेचा कार्यक्रम आटोपून परतत असताना इको कारला समोरून येणार्या पिकअप व्हॅनने जोरात धडक दिली. हा भीषण अपघात शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडला.या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.तर चारजण जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
नरडाणा भागातील वारुळ भागवत कथेचा कार्यक्रम आटोपून घरी परतताना इको कार दसवेल फाट्याजवळ आली. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने येणारी पिकअप व्हॅन इको कारला जोरात धडकली.या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला,तर चारजण गंभीर जखमी झाले.जखमींवर धुळ्यातील हिरे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात पिकअप व्हॅनचा चालक किरकोळ जखमी झाला आहे