धुळे –
धुळे बाजार समितीत कांद्याचे दर पडल्याने आज सकाळी शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी बाजार समितीतील कांदा लिलाव बंद करत बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले आणि जोरदार घोषणा देत शेतकऱ्यांनी परिसरात दणाणून सोडला. आज आम्ही कांदा घेऊन बाजार समितीत आलो होतो. कांद्याला अतिशय कमी दर मिळाला. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला कांदा लिलाव बंद पाडावा लागला. कांद्याला प्रतिक्विंटल हजार रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली.दरम्यान, नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत आज १२ दिवसांनी कांदा लिलावाला सुरुवात झाली.
धुळ्यात कांदा लिलाव बंद
