धुळे – गंगा,गोदावरी,नर्मदा आणि तापी नदीच्या धर्तीवर धुळ्यातील पांझरा नदीची दर मंगळवारी महाआरती करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या मंगळवारी आरतीचा मान किन्नर आखाड्याला देण्यात आला होता.पांझरा आरती सेवा समितीच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या या आरतीला विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.
सामाजिक कार्यकर्ते अॅड.पंकज गोरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पांझरा मातेच्या गेल्या मंगळवारच्या आरतीचा मान किन्नर आखाड्याला देण्यात आला. यावेळी आखाड्याचे प्रतिनिधी निलू पार्वती जोगी,स्वरा पार्वती जोगी तसेच प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेचे भागवत वाघ तसेच पांझरा आरती सेवा समितीचे संस्थापक अॅड पंकज गोरे,कार्याध्यक्ष सोमनाथ गुरव,सचिव अॅड. अमोल पाटील आदींजण उपस्थित होते. येत्या मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी आरतीचा मान विविध वयोगटातील कुस्तीत नावलौकिक प्राप्त केलेल्या मल्लांना देण्यात येणार आहे.