धुळवडीनिमित्त राजनाथ सिंह यांचे
अमेरिकेच्या मंत्र्यासोबतचे नृत्य व्हायरल

नवी दिल्ली- देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी धुळवडीचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीतील शासकीय निवासस्थानी अमेरिकन पाहुण्यांबरोबर धुळवड साजरी केली. यावेळी राजनाथ सिंह यांनी डीजेच्या तालावर अमेरिकन वाणिज्य मंत्र्यांसोबत नृत्य केले . त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
यावेळी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनीदेखील हजेरी लावली. अमेरिकेच्या वाणिज्यमंत्री जीना रायमोंडो या कार्यक्रमाच्या विशेष आकर्षण ठरल्या. कारण पाहुण्यांना रंग लावल्यानंतर जीना रायमोंडो यांनी थेट राजनाथ सिंह यांच्यासोबत डान्स सुरू केला. त्यामुळे सुरुवातीला काहीसे अवघडलेले राजनाथ सिंह यांनी जीना रायमोंडो यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डान्स सुरू केला. खु्द्द राजनाथ सिंह यांनी या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यावरून युजर्सनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या वाणिज्यमंत्री जीना रायमोंडो या गेल्या काही दिवसांपासून भारत दौऱ्यावर आलेल्या आहेत. भारत सरकारकडून त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. रायमोंडो यांनी दिल्लीतील निवासस्थानी धुळवडीसाठी हजेरी लावल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Scroll to Top