सिंधुदुर्ग – सध्या जिल्ह्यातील काजू उत्पादक चिंताग्रस्त आहेत. काजू पिकाला बदललेल्या वातावरणाचा तडाखा बसला असून काही भागांतील काजू बी काळवंडले आहेत. ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव काजू पिकावर झाला आहे.
विशेष म्हणजे दोन फवारण्या घेतलेल्या काजू बागांमध्येदेखील कीड रोग दिसून येत आहे . यंदा जिल्ह्यात काजू हंगाम लांबणार हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मात्र, चांगल्या थंडीमुळे यावर्षी काजूला चांगली पालवी आणि मोहोरदेखील आला होता. त्यामुळे यंदा मोठ्या उत्पादनाची अपेक्षा होती. परंतु,डिसेंबरमध्ये जिल्ह्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले.त्यानंतर धुके आणि वातावरण निर्माण झाले. त्याचा फटका काजू बियांना बसू लागला आहे. अनेक भागातील काजू काळवंडलेल्या स्थितीत दिसत आहेत. पालवी,
मोहोरावर बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे.