धारवाड-बेळगाव-धारवाड
रेल्वेसेवा ६ मार्चपासून सुरु

बेळगाव :बेळगावहून धारवाडला व धारवाडहुन बेळगावला नियमितपणे ये-जा करणाऱ्या या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेसेवा सोमवार, ६ मार्चपासून सुरु करण्यात येत असल्याचेही माहिती खासदार मंगल अंगडी यांनी दिली आहे.

धारवाडहुन सकाळी ८. ५ वा. सुटणारी रेल्वे बेळगावला सकाळी १०.४५ वा. पोहोचेल व बेळगावहून सायंकाळी ७.३० वा.सुटणारी रेल्वे धारवाडला रात्री ९.५५ वा. पोहोचेल. या रेल्वे गाडीला २२ डबे असणार आहेत. एक फर्स्टकम सेकंड टायर एसी कोच, एक २ एसी टायर, एक ३ एसी टायर, ११ स्लीपर कोच, ५ जनरल सेकंड क्लास समानवाहू डबे असणार आहेत. ही गाडी खानापूर,लोंढा,अळनावर या रेल्वे स्थानकांवर थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही रेल्वे पुढे धारवाडहुन म्हैसुरला १०.१० वाजता जाणाऱ्या रेल्वेशी जोड असेल.

Scroll to Top