दोन विमानांची टक्कर टळली
शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले

काठमांडू – आकाशात दोन विमानांची टक्कर होता होता टळल्याची घटना शुक्रवारी घडली.एयर इंडिया आणि नेपाळ एयरलाइन्सची ही दोन विमाने एकमेकांच्या एकदम जवळ आली होती. एक क्षणााचा जरी विलंब झाला असता तरी शेकडो प्रवाशांचे प्राण संकटात आले असते.
काठमांडू विमानतळाच्या दिशेने शुक्रवारी मलेशियातील कौलालंपूरमधून एअर इंडियाचे विमानतळ येत होते. हे विमान सुमारे १९ हजार फुट उंचीवर होते तर नेपाळ एअरलाईन्सचे विमान १५ हजार फुटावरून एकाच दिशेने येत होते. ही दोन्ही विमाने एकमेकांच्या एकदम जवळ आली होती.मात्र वॉर्निंग सिस्टमने वेळीच वैमानिकांनी अलर्ट केल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी नेपाळमधील तीन वाहतुक नियंत्रकांना निलंबित करण्यात आले आहे.नेपाळ एयरलायन्सचे विमान तत्काळ ७ हजार फूट खाली घेतल्याने हा संभाव्य अपघात टळला.हे प्रकरण समोर आल्यानंतर याची चौकशी केली जात आहे. याप्रकरणी तिघांना निलंबित करून सिविल एविएशन अथॉरिटीने अधिक चौकशीसाठी तीन सदस्यीय समितीचे गठन केले आहे.

Scroll to Top