Home / News / दोन खासगी अंतराळवीर स्पेस वॉकचा थरार अनुभवणार

दोन खासगी अंतराळवीर स्पेस वॉकचा थरार अनुभवणार

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ यानाच्या साह्याने चार अंतराळवीर आज अंतराळात रवाना झाले. पृथ्वीपासून तब्बल ७००...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अब्जाधीश उद्योगपती इलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ यानाच्या साह्याने चार अंतराळवीर आज अंतराळात रवाना झाले. पृथ्वीपासून तब्बल ७०० किलोमीटर उंचीवरीत कक्षेत हे अंतराळवीर जाणार असून दोन अंतराळवीर अवकाशात चालण्याचा म्हणजेच ‘स्पेसवॉक’चा थरारही अनुभवणार आहेत. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ कोणत्याही देशाचा अंतराळवीर या कक्षेत गेलेला नाही.त्यामुळे ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्याचबरोबर हे जगातील पहिले खासगी स्पेसवॉक असेल.पाच दिवसांच्या या महत्वाकांक्षी मोहिमेचे नाव ‘पोलारिस डॉन’ असे आहे. अब्जाधीश उद्योगपती जेरेड आयझॅकमन हे मिशन कमांडर आहेत, तर अमेरिकेच्या हवाई दलातील निवृत्त लेफ्टनंट कर्नल किड पोटेट हे वैमानिक आहेत. स्पेसएक्सच्या सारा गिलीस आणि अॅना मेनन या मिशन स्पेशालिस्ट आहेत.या मोहिमेदरम्यान यानाला जोडलेली ड्रॅगन कॅप्सूल अशा उंचीवर पोहोचण्याचा प्रयत्न करेल जिथे अपोलो मोहिमेनंतर कोणीही पोहोचलेले नाही.तिथेच दोन अंतराळवीर अत्यंत जोखमीचे मानले जाणारे स्पेस वॉक करणार आहेत. स्पेस वॉकचा कालावधी वीस मिनिटांचा असेल.

Web Title:
संबंधित बातम्या