सोलापूर – संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर आल्या आहेत. तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पिराची कुरोली गायरान पालखी तळावर मुक्काम केला. त्यावेळी येथील वारतऱ्यांनी या पालखीचे भव्य स्वागत करत दर्शन घेतले. ठाकूरबुवाची समाधी येथे सकाळी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे मोठ्या थाट्यात तिसरे गोल रिंगण पार पडले. त्यावेळी हजारो वारकर्यांनी विठ्ठलाचा जयघोष करत रिंगण सोहळ्यात हजेरी लावली.तुकाराम महाराजांच्या पालखीने काल बोरगावला मुक्काम केला होता. आज सकाळी तुकाराम महाराजांच्या पालखी माळखांबी मार्गे निघली आणि पिराची कुरोली गायरान पालखी तळावर मुक्काम केला. सोमवारी सकाळी ही पालखी भंडी शेगाव मार्गे निघणार आहे आणि या पालखीचे बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण होणार आहे. या पालखीचे वाखरी पालखी तळाला मुक्काम असणार आहे. ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा संपल्यानंतर ही पालखी दुपारी तोंडले-बोंडले येथे भोजनासाठी थांबली. त्यानंतर पालखीची संत सोपानदेवाची भेट झाली. भंडीशेगाव येथे ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्कम झाला. सोमवारी बाजीरावची विहीर येथे या पालखीचे दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण पार पडणार आहे. या पालखीचा सोमवारचा मुक्काम वाखरी येथे असणार आहे.
दोन्ही पालख्या पंढरपूरच्या वेशीवर ज्ञानोबांचे आज दोन रिंगण सोहळे
