सोलापूर – बरडहून आज सकाळी निघालेली संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने सोलापुरात प्रवेश केला. या पालखीने नातपुतेमध्ये मुक्काम केला. त्यावेळी लोकांनी जेसीबीतून फुलांची उधळून ज्ञानेश्वरांच्या पालखीचे जंगी स्वागत केला.आज इंदापूर पालखी तळावरून निघालेली तुकाराम महाराजांची पालखी बावडामार्गे सराटीत दाखल झाली आणि ही पालखी सराटी पालखी तळावर विसावली. उद्या या पालखीचे अकलूजच्या माने विद्यालयात तिसरे गोल रिंगण होणार असून माने विद्यालयातच या पालखीचे मुक्काम असेल. उद्या सकाळी नातेपुतेहून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघाल्यानंतर दुपारी मांडवी ओढा येथे भोजनासाठी थांबणार आहे. त्यानंतर पुरंजवडे येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे गोल रिंगण पार पडणार आहे. माळशिरस येथे या पालखीचे मुक्काम असणार आहे.