सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील दोडामार्ग- बांदा राज्य मार्गावर असलेल्या मणेरी येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे.या रस्त्यावरुन वाहन चालकांना अक्षरशः कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत.या रस्त्यामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
दोडामार्ग तालुक्यातील अनेक रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त केले होते.मात्र, दोडामार्ग- बांदा मार्गवरील मणेरी येथे रस्त्याची दुरवस्था असताना देखील संबधित ठेकेदाराने तेवढाच रस्ता दुरुस्तीपासून वंचित ठेवला आहे. त्यामुळे या रस्त्याची आता अक्षरशः चाळण झाली आहे.या रस्त्यातून प्रवास करताना वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.