दोडामार्ग – सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी घाट माथ्यावर दोन लहान पिल्लांसह एक मोठे अस्वल बागडताना निदर्शनास आले.काही पर्यटकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे.
आतापर्यंत तालुक्यातील उसप,मांगेली येथे अनेकदा अस्वलाचे दर्शन घडले आहे. त्यामुळे या जंगली पट्ट्यात अस्वलाचे वास्तव्य आहे हे स्पष्ट झाले आहे.गेल्या रविवारी काही पर्यटक या भागात फेरफटका मारत होते.त्यावेळी त्यांनाही घाट माथ्यावरील ओसाड रानमाळावर एक अस्वल आपल्या दोन पिल्लांसह मनसोक्त खेळत असल्याचे दिसले.त्यांनी लगेच आपल्या मोबाईलमध्ये हे अस्वलाचे दृश्य कैद केले. पण अस्वलाची नजर या पर्यटकावर पडताच त्याने आपल्या पिल्लांसह जंगलात धूम ठोकली.