नवी दिल्ली – देशातील ११ राज्यांमध्ये पुढील दोन दिवसांत जोरदार पाऊस व गारपिटीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही भागात वादळी वारेही वाहणार असून घनदाट धुके दाटणार आहे.हवामान विभागाने म्हटले आहे की, इराणच्या वायव्य भागातील वादळामुळे उत्तरेतील राज्यांमध्ये जोरदार पाऊस येणार आहे. या काळात थंडीची लाटही येणार असून अनेक राज्यात धुके पसरणार आहे. तामिळनाडू, पद्दुचेरी व केरळमध्ये जोरदार पाऊस पडेल. हरियाणा, पंजाब पूर्व राजस्थानच्या अनेक भागात थंडीच्या लाटेबरोबरच दाट धुकेही असेल. बिहार, सिक्किम व उत्तर बंगालसह उत्तर प्रदेशातही अनेक भागात धुक्याचे साम्राज्य असेल. या कालावधीत थंडीची लाट येणार असली तरी काही भागात किमान तापमानात वाढ होणार आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |