छत्रपती संभाजीनगर – देशातील २१ वी पंचवार्षिक पाळीव पशुगणना येत्या १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.ही पशुगणना मोहीम पुढील चार महिने म्हणजे ३१ डिसेंबरपर्यत चालणार आहे.त्या कामासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण २३६ प्रगणक व ५२ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.पी. डी.झोड यांनी दिली.
डॉ.पी.डी.झोड यांनी सांगितले की,या मोहिमेतील प्रगणकांना यंदा स्वतःचे मोबाईल वापरावे लागणार आहेत.मागील मोहिमेच्यावेळी त्यांना टॅब दिले होते.यावेळी प्रगणकांनामानधन व मोबाईल वापराचा वेगळा मोबदला दिला जाणार आहे.या कामासाठी पशुधन पर्यवेक्षक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांची नियुक्ती केली जाणार आहे.या मोहिमेत गायवर्ग,म्हैसवर्ग,शेळी-मेंढी,अश्व आणि वराह यांची गणना केली जाणार आहे.