देशातील बेरोजगारी वरुन खरगेंची पंतप्रधानांवर टीका

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत केलेले भाषण, देशातील बेरोजगारी व मोदींच्या खोट्या आश्वासनांवरुन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली आहे. आज समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमधून खरगेंनी मोदींना त्यांच्या आधीच्या काही वचनांची आठवण करुन देत काही प्रश्नही विचारले आहेत.

आपल्या पोस्टमध्ये खरगे यांनी म्हटले आहे की, मुंबईतील भाषणात मोदींनी खोट्या वचनांचे एक छान जाळे विणले. राष्ट्रीय रोजगार संस्था म्हणजेच नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीची २०२० साली घोषणा करतांना तुम्ही म्हणाला होतात की ही संस्था कोट्यावधी तरुणांसाठी वरदान ठरणार. सामान्य पात्रता चाचणीच्या माध्यमातून परिक्षांची संख्या कमी होऊन वेळेची बचत होत अनेकांना रोजगार मिळेल. त्याचे काय झाले? एनआरए ने गेल्या चार वर्षात एकही परीक्षा का घेतली नाही? एनआरएला दीड हजार कोटी रुपयांचा निधी दिलेला असतांना त्यातील केवळ ५८ कोटी रुपयेच का खर्च करण्यात आले? देशातील वंचित घटकांना नोकऱ्यांपासून दूर ठेवण्यासाठी एनआरएला निष्क्रिय ठेवण्यात आले आहे का ? एनटीए मध्ये हेराफेरी झाली. पेपर फुटल्याने लाखो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त झाले. यापूर्वीही हा मुद्दा उपस्थित केला तरी सरकार गप्प का बसत आहे?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top