पुणे- नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास काहीसा अडखळत होत आहे. काल महाराष्ट्राच्या नंदूरबार जिल्ह्याच्या काही भागातून पावसाने माघार घेतली आहे.मात्र त्यानंतर राज्यातील परतीची मान्सूनची वाटचाल थांबली होती .
पावसाने २३ सप्टेंबर रोजी वायव्य राजस्थान आणि कच्छमधून परतीचा प्रवास सुरू केला. २४ सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागासह पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून परतल्यानंतर परतीची वाटचाल थबकली. २ ऑक्टोबर रोजी तब्बल आठ दिवसांनी पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला. त्यानंतर आता उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेशच्या आणखी काही भागासह, उत्तर महाराष्ट्र आणि अरबी समुद्राच्या आणखी काही भागातून पावसाने मुक्काम हलवला आहे.