हैदराबाद- ‘आंतरराष्ट्रीय मंदिर परिषद व प्रदर्शन २०२५’ आजपासून १९ फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे आंतरराष्ट्रीय टेम्पल कनव्हेंशन आंध्र प्रदेशात होत आहे. याआधी २०२३ साली वाराणसी येथे पहिले आंतरराष्ट्रीय टेम्पल कनव्हेंशन पार पडले होते. या परिषदेकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून आंध्रप्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष परम पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची भेट घेतली.
तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भगवान बालाजीचे दर्शन घेण्याची माझी आज इच्छा पूर्ण झाली, त्यांनी निवडणुकीत जो आशीर्वाद दिला आणि आम्हाला यश मिळाले आहे. देशभरातील मंदिरांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावे, परंपरा योग्य प्रकाचे चालाव्यात याकरीता आंतरराष्ट्रीय मंदिर परिषद व प्रदर्शन महत्त्वाचे आहे. प्रसाद लाड यांच्या पुढाकारातून हे यशस्वी होत आहे.