नागपूर- नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयानंतर त्यांच्या आई सरिता फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की, माझा मुलगा मुख्यमंत्री व्हावा, ही राज्यातील जनतेची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या सहा महिन्यांत विजयासाठी खूप मेहनत घेतली आहे. या कालावधीत दररोज त्यांनी केवळ दोन-तीन तासांची झोप घेतली. मेहनतीने, कष्टाने आणि लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने त्यांना हा विजय मिळाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यात मध्यंतरी अनेक आरोप केले. यावर त्या म्हणाल्या की, त्या आरोपानानंतरही देवेंद्र अढळ आणि अविचल राहिला. तो सहज विचलीत होत नाही. हा त्याचा खास गुण या सगळ्यातून समोर आला आहे.