दुबई- अलिकडेच दुबईमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होऊन अक्षरशः पूर आला होता. त्याच दुबईच्या तापमानाचा पारा आता अचानक ६२ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याचा प्रकार घडला. मंगळवार १६ जुलै रोजी दुपारी हे सर्वोच्च तापमान दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअरपोर्टवर नोंदले गेले.
मंगळवारी दुपारी ३ वाजता दुबईतील तापमानाचा पारा अचानक ६२.२२ अंश सेल्सिअस झाला होता.हा तापमानाचा पारा सायंकाळी ५ वाजता ५३.९ अंश सेल्सिअसवर घसरला. हे चढते तापमान आरोग्यासाठी योग्य नाही. कोणताही सजीव प्राणी अशा तापमानात तग धरु शकत नाही.वाळवंटी शहर दुबई का तापले आहे याविषयी आता चर्चा सुरु झाली आहे. ज्यादिवशी हे तापमान सर्वोच्च पातळीवर पोहचले त्यावेळी हवेत दमटपणा देखील होता. हवा देखील तापली होती.एअर टेंपरेचर ४२ डिग्री सेल्सिअस होते. आर्द्रता ८५ टक्के होती. त्यामुळे तापमान ६२.२२ अंशावर पोहचले होते.दुबईत सरासरी पारा ४० डिग्रीच्या आसपास असतो.