संगमनेर – शेतकऱ्यांच्या दुधाला ४० रुपये प्रति लिटर भाव मिळावा या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील कोतुळ या गावाहून आज संगमनेर प्रांत कार्यालयावर ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. गावागावातून शेकडो शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह यात सहभागी झाले होते .अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी पंजाबमधील आंदोलनाच्या धर्तीवर हे आंदोलन केले. या रॅलीमधील सहभागी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव मिळावा अशी मागणी केली. त्याबरोबरच पशुखाद्याचे दर कमी करावे, दुधासाठी किमान निश्चित किंमत व रेव्हेन्यू शेरिंगचे धोरण लागू करावे, दूध भेसळ थांबवावी या मागण्यांसाठी गेले १८ दिवस कोतुळ या ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत . या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले.
दुधाला ४० रुपये प्रतिलिटर भाव द्या शेतकऱ्यांची कोतूळला ट्रॅक्टर रॅली
