सुप्रीम कोर्टाने पतंजलीला फटकारले
नवी दिल्ली
आधुनिक औषधे आणि लसींच्या विरोधात जाहिराती करू नका, नाहीतर दंड आकारला जाईल, असे म्हणत योगगुरु रामदेव बाबांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ कंपनीला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले आहे. कुठल्याही प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती किंवा खोटे दावे कंपनीने केल्यास दंड आकारला जाईल, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजली आयुर्वेद कंपनीविरोधात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज सुनावनी झाली. या सुनावनीदरम्यान न्यायालयाने पतंजली कंपनीला फटकारले. न्यायालयाने कंपनीला दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्याची ताकीद दिली.