पुणे :
पुणे सासवड मार्गावरील दिवे घाटामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात टँकर दरीत कोसळून दोन जण जागीच ठार झाले. यासोबत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दल दाखल झाले. या अपघातग्रस्त टँकरखाली अडकलेल्यांना बाहेर काढून तडक रुग्णालयात दाखल केले. मात्र यात २ जणांचा मृत्यू झाला असून ४ गंभीर जखमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सासवडच्या दिशेकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकरने समोरून येणाऱ्या वाहनांना धडक देत दरीत जाऊन कोसळला. अचानक झालेल्या घटनेने काही वेळ नागरिकांना काही समजेनासे झाले होते. मात्र टँकर वेगात असल्याने त्याला थांबवणे देखील अवघड होते. मात्र वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो टँकर थेट दरीत कोसळला. दिवे घाटात हा अपघात झाला असून या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. यांनतर पोलिसांकडून वाहतूक कोंडी दूर करण्यात आली.