लासलगाव- सहा दिवसांच्या दिवाळीच्या सुट्टीनंतर राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये कालपासून कांद्याचे लिलाव सुरू झाले आहेत. काल सकाळच्या सत्रात लासलगाव बाजारात ८०० क्विंटल कांद्याची आवक झाली.याठिकाणी कांद्याला कमीत कमी ३८०० रुपये तर सरासरी ४ हजार ६०० रुपये दर मिळाला.
काल सोमवारी पणन मंडळातर्फे सांगण्यात आले की,सकाळच्या सत्रात १९ हजार क्विंटल कांदा आवक झाली.मुंबई मार्केटला सर्वाधिक ७ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली तर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव,पिंपळगाव मार्केटला कांद्याची आवक होऊन लासलगाव बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १७२१ रुपये तर सरासरी ३३२१ रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी २७५१ रुपये तर सरासरी ४ हजार ६०० रुपये दर मिळाला. पिंपळगाव मार्केटमध्ये लाल कांद्याला २२२५ रुपये तर सरासरी ३५०० रुपये दर मिळाला तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी ३६०० रुपये आणि सरासरी ४६०० रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याची ६ हजार क्विंटलची आवक होऊन ३७५० रुपये दर मिळाला. कल्याण बाजारात नंबर एकच्या कांद्याला ४६५० रुपये दर मिळाला. कोल्हापूर बाजारात सर्वसाधारण कांद्याला ३ हजार रुपये दर मिळाला.