लातूर – दिवाळी व छटपूजा या उत्सवांसाठी लातूर ते हडपसर मध्ये एक विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या रेल्वेचे आरक्षण उद्यापासून सुरु होणार आहे. ही विशेष रेल्वेगाडी २५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर दरम्यान चालणार आहे.रेल्वे क्रमांक ०१४२९ ही रेल्वे आठवड्यातून चार दिवस सकाळी साडेनऊ वाजता लातूर वरुन निघणार असून ती त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता हडपसरला पोहोचेल. १८ डब्यांच्या या गाडीला हरंगुल, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डुवाडी व दौंड स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत.
दिवाळी व छटपूजेसाठी विशेष रेल्वेची घोषणा
