Home / News / दिवाळीवर आचारसंहितेचे सावट उटणे पाकिटांवर नेत्यांना बंदी

दिवाळीवर आचारसंहितेचे सावट उटणे पाकिटांवर नेत्यांना बंदी

मुंबई- यंदाच्या दिवाळी सणावर निवडणूक आचारसंहितेचे सावट दिसत आहेत. आकाश कंदील तसेच सुगंधी उटणे पाकीटांवरून राजकीय नेत्यांचे फोटो गायब झाले...

By: E-Paper Navakal

मुंबई- यंदाच्या दिवाळी सणावर निवडणूक आचारसंहितेचे सावट दिसत आहेत. आकाश कंदील तसेच सुगंधी उटणे पाकीटांवरून राजकीय नेत्यांचे फोटो गायब झाले आहेत. दिवाळी भेटीचे वाटप करण्यापासून राजकीय नेत्यांनी हात आखडता घेतल्याचे दिसत आहे.

दरवर्षी दिवाळीत राजकीय नेत्यांचे फोटो असलेले किंवा त्यांची नावे असलेले आकाश कंदील बनवले जातात. या नेत्यांचे फोटो असलेली सुगंधी उटण्याची पाकिटे घरोघरी वाटली जातात. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे अशा कंदिलाच्या आणि उटण्याच्या पाकीटांची मागणी घटली आहे.
राजकीय पक्षांकडून कंदिलाची ऑर्डर बंद झाल्याने कंदील व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.त्याचप्रमाणे दिवाळी पहाट आणि दीपसंध्या सारख्या कार्यक्रमांनाही ब्रेक लागला आहे.यंदा राजकीय वरदहस्त लाभणार नसल्याने शहरी भागातील सार्वजनिक मंडळे आणि संस्था दिवाळीच्या जल्लोषापासून वंचित राहणार आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या