Home / News / दिवाळीत मुंबई – नांदेड दरम्यान विशेष एक्स्प्रेस ट्रेन चालविणार

दिवाळीत मुंबई – नांदेड दरम्यान विशेष एक्स्प्रेस ट्रेन चालविणार

मुंबई- रेल्वे प्रशासनाने मुंबईहून दिवाळीच्या काळात एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.ही गाडी मुंबई ते नांदेड दरम्यान चालवली...

By: Team Navakal

मुंबई- रेल्वे प्रशासनाने मुंबईहून दिवाळीच्या काळात एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.ही गाडी मुंबई ते नांदेड दरम्यान चालवली जाणार आहे. ही विशेष एक्स्प्रेस गाडी पनवेलहून सोडली जाणार आहे.

पनवेल- नांदेड द्विसाप्ताहिक दिवाळी विशेष गाडी ही गाडी २२ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर या काळात चालवली जाणार आहे.या काळात ही गाडी मंगळवारी आणि गुरुवारी पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी अडीच वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजता आपल्या गंतव्य स्थानी म्हणजेच नांदेडला पोहोचणार आहे. तसेच नांदेड पनवेल विशेष गाडी २१ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक सोमवारी आणि बुधवारी रात्री अकरा वाजता नांदेड येथून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री १.२५ वाजता आपल्या गंतव्यस्थानी म्हणजेच पनवेलला पोहोचणार आहे. या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड,नागरसोल,रोटेगाव,लासूर,औरंगाबाद,जालना, परतूर,सेलू, मानवत, परभणी आणि पूर्णा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा असणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या