देवगड – काल दीपावलीच्या पहिल्याच दिवशी देवगड तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस पडला.अचानक पाऊस सुरू झाल्याने लोकांची तारांबळ उडाली. संध्याकाळी पाच वाजल्यापासून पावसाने जोरदार सुरुवात केल्याने अनेक भागात वीज गायब झाली होती.
दिवाळीचा पहिलाच दिवस असल्यामुळे बाजारपेठांमध्ये विविध वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती; मात्र मेघगर्जनासह अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.दिवाळीच्या तोंडावर गुलाबी थंडीची चाहूल लागते.मात्र गेल्या काही वर्षांत पर्यावरणीय समतोल ढासळल्याने नैसर्गिक आपत्तीत वाढ झाली आहे.शेती व बागायती पिकांची यामुळे नुकसान होत आहे.भात पीक कापणी सुरू असून यंदा दीपावलीला पोहे बनविण्यासाठी तांदुळ बहुतेक ठिकाणी शेतकर्यांना मिळाले नाहीत.