Home / News / दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून! नाना पटोले यांचे वक्तव्य

दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून! नाना पटोले यांचे वक्तव्य

मुंबई- महाराष्ट्रात केवळ मारकडवाडी येथेच नाही, तर प्रत्येक गावातील ही समस्या आहे. राज्यात आलेले सरकार अजूनही जनतेच्या मनातील सरकार नाही....

By: E-Paper Navakal

मुंबई- महाराष्ट्रात केवळ मारकडवाडी येथेच नाही, तर प्रत्येक गावातील ही समस्या आहे. राज्यात आलेले सरकार अजूनही जनतेच्या मनातील सरकार नाही. सरकार कसे आले याबाबत महाराष्ट्रातील लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे अनेक गावात इव्हीएमला विरोधाचा ग्रामसभेचा ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून होत आहे. याची दखल निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी, अशी मागणी काॅंग्रेस नेते नाना पटोले यांनी केली.
मविआ आमदारांनी काल आमदारकीची शपथ घेण्यास नकार दिला होता. मात्र आज त्यांनी शपथ घेतली. याबाबत प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, हे सरकार जनतेच्या मतातील नाही अशी जनतेची भावना आहे. आमची मते चोरली गेलेली आहेत. एका रात्रीत ७६ लाख मते वाढली. तिथेच सगळी डाळ काळी झालेली आहे. जनभावना मांडण्यासाठी विधानसभा आणि लोकसभा आहे. आम्ही जनभावना मांडण्याचे काम काल केले आहे. आम्ही निवडून आलेले आमदार आहोत. आता आम्ही विधानसभेत आणि रस्त्यावर लढाई लढू .

Web Title:
संबंधित बातम्या