नवी दिल्ली- राजधानी दिल्लीतील अनेक भागात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणीच पाणी झाले. सुटीचा दिवस असल्याने जनजीवन विस्कळीत झाले नसले तरी अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले. दिल्लीच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणीच पाणी झाले. दिल्लीसह हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेशातही जोरदार पाऊस झाला असून राजस्थानात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आजपासून दिल्ली, राजस्थान, बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालयसह देशाच्या दक्षिणेकडील तामिळनाडू, पद्द्चीरी, या भागातही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. हरियाणातील नकटी नदीला आलेल्या पुरामुळे किनाऱ्यालगलत्या शहरांमधील सखल भागात पाणीच पाणी झाले. हिस्सार शहरातील मोहल्ला नई टोली, शिव कॉलनी, मोहल्ला वासतियान या भागातील घरांमध्ये पाणी गेल्याने संसारोपयोगी वस्तू निकामी झाल्या. राजस्थानमध्येही आज जोरदार पाऊस झाला. राजस्थानमधील करौली, भरतपूर, हिंडेनसहीत अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. अनेक नदी नाल्यांमध्ये काही जण वाहून गेल्याचे वृत्त आहे. कोटामधील पावसाने अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत.