नवी दिल्ली – दिल्ली सहारनपूर मार्गावर काल रात्री झालेल्या एका अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रकला कार धडकून हा अपघात झाला.दिल्ली सहारनपूर महामार्गावर गंगनहरपूरच्या जवळ रात्री हा अपघात झाला. अपघात ग्रस्त कार शामलीच्या दिशेने जात होती. यावेळी नानौती पोलीस ठाण्याच्या हद्दीत जंधेडी जवळ एक ट्रक महामार्गावर उभा होता. त्याला पाठीमागून कार धडकली. हया अपघातात कारचा चक्काचूर झाला. पोलिसांनी मोठ्या मुश्किलीने ट्रकच्या खालून या तिघांचे मृतदेह बाहेर काढले. हे तिघे तरुण शांकभरी मातेच्या दर्शनाला जात होते.
दिल्ली सहारनपूर मार्गावरील अपघातात तीन जण ठार
