नवी दिल्ली -दिल्लीच्या विधानसभेसाठी उद्या राज्यातील ७० मतदार संघात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. या निवडणुकीसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी राज्यभरात १ लाख १८६ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत, त्यापैकी १३ हजार ७६६ मतदान केंद्रांवर १ कोटी ५६ लाख मतदार मतदान करतील. त्यापैकी ८३ लाख ७६ हजार पुरुष आणि ७२ लाख ३६ हजार महिला मतदार आहेत. मतमोजणी ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान
