नवी दिल्ली- दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेच्या कंत्राटदाराला केंद्राकडून ५० लाखांचा दंड ठोठावला आहे. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वेवर खाचखळग्यांवर आपटून एका वेगवान कार हवेत उडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तसेच रस्ता दुरूस्तीवेळी वाहनचलाकांना सावध करणार्या सूचनाही कंत्राटदाराने लावल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कंत्राटदाराला खराब रस्ता बनवल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे. तर या महामार्गासंबंधीच्या काही अधिकाऱ्यांचीदेखील हकालपट्टी केली आहे.
हा दंड ठोठावल्याने चांगला पायंडा पडेल. त्यामुळे एक्स्प्रेस-वेचे काम करताना दर्जा राखला जाईल, असे महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे.