नवी दिल्ली- दिल्ली क्राईम ब्रँचने लॉरेन्स बिश्नोई गँगवर आज मोठी कारवाई केली. यात बिश्नोई गँगच्या अड्ड्यांवर छापा टाकून एकूण ८ जणांना अटक करण्यात आली. याशिवाय ६ शास्त्रास्त्रेही जप्त करण्यात आली. गोल्डी ब्रार -लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य खंडणीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर करतात, असे देखील दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहिती स्पष्ट केले. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या आणि बॉलिवूड स्टार सलमान खानला धमकीचे पत्र दिल्याच्या आरोपामुळे लॉरेन्स बिष्णोई गँग संपूर्ण देशात पुन्हा एकदा चर्चेत आली. सिद्धू मुसेवाला हत्येनंतर गोल्डी ब्रार-लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्रमुख गँगस्टर बिश्नोईसह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, बिश्नोई पोलिस कोठढीत असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दिल्ली क्राईम ब्रँचची कारवाई! बिश्नोई गँगच्या ८ जणांना अटक
