दिल्ली एम्समध्ये कोरोनाचा उद्रेक अनेक कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा कोरोनाने धोक्याची घंटा वाजवली आहे. दिल्लीतील प्रतिष्ठित एम्स (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) मध्ये अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एम्सने एक नियमावली जारी केली आहे. कोरोनाबाबत डॉक्टरांनी योग्य नियम पाळावेत, असे संस्थेने म्हटले आहे.

यात सर्व रुग्णालयातील कर्मचार्‍यांना कामावर सर्जिकल मास्क घालण्यास सांगितले आहे आणि गर्दी टाळण्यास सांगितले आहे. विशेषत: कॅन्टीनमध्ये, आणि वारंवार स्पर्श केलेल्या पृष्ठभागापासून दूर राहणे, एम्स व्यवस्थापनाने कामाच्या ठिकाणी योग्य स्वच्छता आणि वारंवार स्वच्छता सुनिश्चित केली पाहिजे असे म्हटले आहे. यासोबतच शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड रुमाल/ टिश्यूने झाकणे. वैयक्तिक स्वच्छता आणि शारीरिक अंतर राखणे. एवढेच नाही तर आता अधिक लोकांना हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये जमणे टाळण्यासही सांगण्यात आले. कार्यालयात कोणत्याही ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ नयेत, जर कोणाला अस्वस्थ वाटत असेल तर, त्यांच्या रिपोर्ट देणाऱ्या अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर, ते बरे होईपर्यंत कामावर येऊ नये. ज्या कर्मचाऱ्यांना जास्त धोका आहे जसे की गरोदर स्त्रिया किंवा वृद्धावस्थेत त्यांनी अशा परिस्थितीत अतिरिक्त सावधगिरी बाळगली पाहिजे.

देशात कोरोनाची सातत्याने वाढ

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १०,१५८ नवीन रुग्ण आढळले आहेत, जे मागील दिवसाच्या तुलनेत ३० टक्क्यांनी अधिक आहे. पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ दिसून आली आहे आणि सध्या तो ४.४२ टक्क्यांवर आहे. आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या ४९,६२२ वर पोहोचली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top