दिल्लीत ४० शाळांना बॉम्ब धमकी ईमेलद्वारे ३० हजार डॉलरची मागणी

दिल्ली – दिल्लीत जवळपास ४० हून अधिक शाळांना काल रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास बॉम्बने उडवण्याची ईमेलद्वारे धमकी मिळाली . धमकी देणाऱ्याने ३० हजार डॉलरची मागणी शाळा प्रशासनाकडे केली. मी शाळेच्या इमारतींमध्ये अनेक बॉम्ब पेरले आहेत. बॉम्ब लहान आणि अतिशय योग्य पद्धतीने लपवलेले आहेत. त्यामुळे इमारतीचे फारसे नुकसान होणार नाही, मात्र बॉम्बचा स्फोट झाल्यास अनेक जण जखमी होतील. जर मला ३० हजार डॉलर मिळाले नाहीत, तर मी बॉम्बस्फोट करीन ,” असे धमकीच्या ईमेलमध्ये नमूद होते.

धमकी मिळालेल्या शाळांमध्ये मदर मेरी ब्रिटिश स्कूल, सलवान पब्लिक स्कूल, केंब्रिज स्कूलसह दिल्लीतील टॉप शाळांचा समावेश आहे. शाळा व्यवस्थापनांना बॉम्बच्या धमकी बद्दल समजले तोपर्यंत विद्यार्थी वर्गात पोहोचले होते . शाळा प्रशासनाने मुलांना तात्काळ घरी पाठवून, शाळा परिसर रिकामा केला. या धमकीची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर अग्निशमन दल आणि दिल्ली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. मात्र झडतीमध्ये पोलिसांना काहीही संशयास्पद आढळले नाही. हा मेल केवळ घाबरवण्याच्या उद्देशाने केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top