नवी दिल्ली- दिल्लीतील गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर चाकूने वार केल्याची घटना घडली. शोएब असे हल्लेखोराचे नाव आहे,.तर कासीम असे पीडित तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी घडली. ईशान्य दिल्लीतील सुंदर नगरी परिसरात हा थरकाप उडवणारा प्रकार घडला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कासीमवर चाकू हल्ला झाल्याने तो यात जखमी झाला. त्याला तातडीने जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील वैद्यकीय उपचारासाठी त्याला एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये हलविण्यात आले. मात्र. कासीमने या घटनेबाबत अद्याप पोलिसांना कोणतीही माहिती दिलेली नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये हल्ल्या केल्याचे दृश्य कैद झाले आहे. यात शोएब कासीमला आधी हाताने आणि नंतर धारदार शस्त्राने मारताना दिसत आहे. दरम्यान, या हल्ल्यावेळी शोएबला कोणीही थांबवले नाही. या घटनेनंतर, शोएबला पकडण्यात पोलिसांना यश आले. तथापि हल्ल्यामागील हेतू अजूनही अस्पष्ट आहे.