Home / News / दिल्लीत आजपासून महिला सन्मान संजीवनी योजनेची नोंदणी सुरू

दिल्लीत आजपासून महिला सन्मान संजीवनी योजनेची नोंदणी सुरू

दिल्ली दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी कंबर कसली असून त्यांनी आज दिल्लीत महिला सन्मान...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

दिल्ली दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी कंबर कसली असून त्यांनी आज दिल्लीत महिला सन्मान आणि संजीवनी योजनेसाठी उद्यापासून नोंदणी सुरू होणार असल्याची घोषणा केली.केजरीवाल म्हणाले की, आमची टीम घरोघरी जाऊन संजीवनी योजना आणि महिला सन्मान योजनेसाठी नोंदणी करणार आहे. यासाठी दिल्लीचे मतदार ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्यावेळी तुमचे मतदार यादीतील नाव रद्द झाले आहे की नाही हेही तपासू शकता. कारण त्यांनी(भाजपा) मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे रद्द केलेली आहेत. आम्ही या दोन्ही योजना जाहीर केल्या होत्या. त्यातील संजीवनी योजनेमुळे ६० वर्षांवरील वृद्धांना मोफत उपचार मिळणार आहेत. निवृत्तीनंतर अनेक कुटुंबातील वडीलधाऱ्यांची काळजी कोणी घेत नाही. आता आप सरकार त्यांच्यावर उपचार करणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या