नवी दिल्ली – नवी दिल्लीतील हवेची प्रदूषण गुणवत्ता खाली घसरली असून सध्या ती धोकादायक पातळीवर आलेली आहे. काल दिल्लीत हवेची गुणवत्ता ३०७ एक्युआई नोंदवण्यात आली. परवा ही गुणवत्ता केवळ २६८ होती. उद्या व परवा हवेतील प्रदूषण अधिक वाढण्याची शक्यता असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे.दिवाळी निमित्ताने होणारी आतिषबाजी व फटाक्यांमुळे या प्रदूषणात मोठी वाढ होईल असेही प्रदूषण मंडळाने म्हटले आहे. काही ठिकाणी नागरिकांना श्वास घेण्यासही अडचण येऊ शकते. फरीदाबाद, गाजियाबाद, ग्रेटर नोएडा, गुरुग्राम व नोएडा मध्येही प्रदूषणाचा स्तर धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. रस्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. काल दिल्लीत उत्तर पूर्व व उत्तर पूर्व या दिशेने वारे वाहिले. ६ ते ८ किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱे अधिक वेगाने वाहतील त्यामुळे हवेतील प्रदूषण काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकेल. दिल्लीतील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी येथे फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही प्रदूषण वाढत असून त्याचा सर्वाधिक त्रास हा वृद्धांना व लहान मुलांना होण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाचा स्तर धोकादायक पातळीवर
