हिंगोली:
हिंगोली जिल्ह्यातील खानापूर चिता येथील शेतकरी राम जाधव यांना दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे खास निमंत्रण मिळाले. हे निमंत्रण थेट पंतप्रधान कार्यालयातून आल्याने जाधव खूप आनंदी झाले. माझ्यासाठी हा मोठा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले. ते दिल्लीसाठी रवानाही झालेले आहेत.
राम जाधव हे प्रजाकसत्ताक दिनाचे निमंत्रण मिळालेले महाराष्ट्रातील एकमेव शेतकरी आहेत. त्यांनी पंतप्रधान किसान योजनेच्या १९ व्या हप्त्यासह इतर किसान योजनाचा लाभ घेतला आहेत. त्यामुळे त्यांना हे निमंत्रण आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारच्या सुरू केलेल्या योजना फलदायी आहेत. या योजनांचा मीही लाभ घेतलेला आहे. आपल्या ध्यानीमनी नसतानाही दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचे आमंत्रण मिळाल्याचे ते म्हणाले.