नवी दिल्ली – दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु स्टेडियममधून दिलजीत दोसांजीच्या गाण्याच्या कार्यक्रमानंतर या क्रिडांगणाची दुरावस्था झाली आहे. या दुरावस्थेविषयी खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.एथलिट बिआंत सिंग याने कार्यक्रमानंतरच्या स्टेडिअमची छायाचित्रे प्रसारित केली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ज्या ठिकाणी खेळाडू सराव करतात त्या ठिकाणी लोकांनी मद्यसेवन करत मोठी पार्टी केली. या स्टेडियममध्ये आता जागोजागी मद्यांच्या बाटल्यांचे ढीग आहेत. सगळीकडे कचराच कचरा पसरला आहे. प्रेक्षकांनी येथील खेळांच्या साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. धावण्याचा ट्रॅकही खराब करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला परवानगी दिल्याबद्दल बिआंत सिंग यांनी आयोजकांवर टीका केली आहे. त्यांच्या वाईट आयोजनामुळे हे स्टेडिअम आता पुढील १० दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे खेळाडूंना सरावकरायला मिळणार नाही.
दिल्लीच्या संगीत कार्यक्रमामुळे स्टेडियमची दुरावस्था! खेळाडू नाराज
