नाशिक- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून दिंडोरीचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज ही घोषणा केली. ते म्हणाले की, झिरवाळ हे केवळ आदिवासीचे नेते नव्हे तर अख्ख्या राज्याचे, सर्व समाजाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. येथील उमेदवार घड्याळाच्या चिन्हावरच निवडणूक लढणार आहे.
तटकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून नाशिक जिल्ह्यातील विविध मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. राज्याच्या इतिहासात आजवर अनेक यात्रा निघाल्या. मात्र आता साठी रोहित पाटील आणि अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केली आहे.