दुबई – दाक्षिणात्य अभिनेता अजिथ कुमार याच्या रेसिंग कारला झालेल्या अपघातात तो सुखरुप बचावला असून पुन्हा शर्यतीच्या सरावातही सहभागी झाला.दुबईत ११ जानेवारी रोजी दुबई २४ अवर सेस ही रेसिंग कारची शर्यत होणार आहे. या शर्यतीमध्ये दाक्षिणात्य अभिनेता अजिथ कुमारही स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. दुबईत तो या शर्यतीचा सराव करत होता. त्याची कार यावेळी १८० किलोमीटर प्रतितास वेगाने जात असतांना ट्रॅकवरच्या एका भिंतीला धडकली. त्यानंतर या गाडीने चक्क सात गिरक्या घेतल्या. या अपघातात कारच्या समोरच्या बाजूची तोडफोड झाली असली तरी अभिनेता अजिथ कुमार हा सुरक्षित बचावला. तिथे असलेल्या त्याच्या मदतनीसांनी त्याला बाहेर काढले. तो काही वेळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा रेसिंगच्या सरावाला सज्ज झाला असून तो परवा होणाऱ्या शर्यतीतही सहभागी होणार असल्याची माहिती त्यांच्या चमूने दिली आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |