कोटा- राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मोबाईलवर अभ्यास करत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. केशव चौधरी (१६) असे विद्यार्थाचे नाव असून तो भीलवाडा जिल्ह्यातील आरसी व्यास सेक्टर-७ येथील रहिवासी होता. तो सध्या आपल्या आई आणि मोठ्या भावासोबत कोटामधील परिजात कॉलनीत राहात होता. मोठा भाऊ आदित्य चौधरी जेईई परीक्षेची तयारी करत असून केशव दहावीच्या परीक्षेची तयारी करत होता. दोघेही एकत्र अभ्यास करत असताना अचानक केशव पलंगावरून जमिनीवर कोसळला. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दहावीच्या विद्यार्थ्याचा हदयविकाराने मृत्यू
